Lower Parelcha Raja

मानाजी राजुजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
स्थापना : १९३५, नोंदणी क्र. : एफ – २४३८९

Top Sponsors

आमचे प्रायोजक

मंडळ

मानाजी राजुजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

स्थापना वर्ष

१९३५

नोंदणी क्रमांक

एफ – २४३८९

Description

वर्ष

८९वे

मनोगत

बुद्धी द्यावी तुझे गुणगाया.. .

१४ विद्या, ६४ कलांचा अधिपती, आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत “श्री” आगमनाची चाहूल लागताच मन आनंदाने, उत्साहाने प्रसन्न होते.  
बाप्पा येणार आमची सर्व दु:ख, संकट दुर करणार असा दृढ विश्वास श्रध्दा प्रत्येकाच्या मनात रुजलेली आहे. बुद्धीदाता, सुखकर्ता, दुख:हर्ता मंगलमुर्तीच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन सन २०२२-२०२३ चा वार्षिक अहवाल समस्त भक्‍तजनांना सादर करताना आनंद वाटतो.

उत्सव मंडळाचे यंदा ८९ वे वर्ष, गेली ८८ वर्षे अव्याहात सातत्याने आपल्या उत्सवाचे वैशिष्ट्य अबाधित ठेवणे हे आपणासारख्या गणरायावर व या उत्सवावर श्रध्दा ठेवणाऱ्या निस्सीम भक्तांमुळे सहज साध्य झाले.
सतत वाढत असलेली महागाई, ही तर न संपणाऱ्या गोष्टी सारखी आहे. पण श्री गणेशाच्या चरणी निष्ठा असलेले चाळीतील सर्व रहिवाशी, उत्सव मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, लोअर परळ व्यापारी मित्र मंडळ पदाधिकारी, फेरीवाले संघटना, विभागातील सर्व व्यापारी वर्ग ही सारी मंडळी हा उत्सब आपलाच आहे.
अशा शाह-नाहर इंडस्ट्रियल इस्टेट, मिडसिटी इंडस्ट्रिज, मार्केटिंग फेडरेशन, सनमिल कंपाऊंड, तोडी इंडस्ट्रियल इस्टेट, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट, अध्यारु इंडस्ट्रियल इस्टेट आणि केवल इंडस्ट्रियल इस्टेट मधील मान्यवर, दानशूर, उद्योगपती यांनी यथाशक्ती उदार हस्ते हस्ते बहुमोल अर्थ सहाय्य दिले ही श्री चरणी असलेली श्रध्दा अविरत, अचल राहो. श्री त्यांच्या उद्योग- धंद्यामध्ये यश देवो हि श्री गणराया चरणी प्रार्थना!

श्रींच्या उत्सव आरंभापासून उत्सवाची पुर्ण सांगता होईपर्यंत चाळीतील पुरुष- महिला, लहान-थोर कार्यकर्ते अगदी तन-मन-धन समर्पित करून उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जे परिश्रम करतात त्यांचे कौतुक करताना मन भरुन येते. हिच श्रध्दा, भावना कायम राहू दे. हिंद युवक संघ, यंग विजय क्रिडा मंडळ, संयुक्‍त मानाजी राजुजी चाळ गोविंदा पथकातील पदाधिकारी, कार्यकर्ते, उत्सव मंडळाचे कार्यकर्ते बाहेरुन देणग्या, जाहिरातीद्वारेअत्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्याचा भार उचलून फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

उत्सव कालावधीमध्ये पहाटेच्या प्रसन्न वातावरणात षोडपचार मंत्राद्रारे रोज पूजा आरती होते. शिवाय दुग्धाभिषेकाची प्रथा भक्‍तीपूर्वक यथासांग पार पाडतात, तर महाअभिषेकाच्या वेळी लहान-थोर मुले-मुली यांच्या मोठ्या सहभागाने जणू काही भक्तांचा मेळा श्रीं च्या मंगल मंदिरात अवतरल्याचा भास होतो. भक्‍तीरसाने वातावरण मंत्रमुग्ध होते आणि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायचा दिवस येतो. तेव्हा बाप्पाला निरोप देताना चाळीतील समस्त रहिवाशी उत्साहाचे एकरुप होऊन प्रचंड मिरवणूकीत सामिल होऊन मिरवणूकीची शान वाढवतात. विशेष, येथून स्थलांतर झालेले अनेक रहिवाशी आजही या मिरवणूकीत सामिल होतात.

आपल्या विभागात हिंदू, मुस्लिम, गुर्जर आणि अन्य विविध धर्मांचे लोक भक्तीभावाने उत्सवात समरस होऊन श्री चरणी नतमस्तक होतात हेच या उत्सवाचे वेगळे वैशिष्ट आहे.

आनंदाचे उत्साहाचे हे क्षण उपभोगताना काही कटु आठवणी मनाला वेदनादायक होत्या, त्या स्मरणातून जात नाहीत.
उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष कै.रामचंद्र बांदिवडेकर, मंडळाचे आधारस्तंभ कै.रविंद्र म्हामुणकर, माजी सचिव कै.महेश बोभाटे, तरुण कार्यकर्ते कै.अनिल मोरे, कै.मंदाकिनी चव्हाण, कै.सुबोध बांदिवडेकर यांची उणीव नक्कीच जाणवेल.
तसेच चाळीतील मृत पावलेल्या अन्य व्यक्तींच्या कुटुंबियांना झालेल्या दु:खातउत्सव मंडळ सहभागी आहे.

उत्सवाचा प्रचंड व्याप सांभाळताना ज्यांनी सहभाग दिला त्या सर्वांचा उल्लेख होणे आवश्यक आहे. अनवधाने नजरचुकीने राहून गेल्यास क्षमस्व!
मात्र त्यांची सेवा श्रींच्या
चरणी रुजू झाली.

-अनंत भंकाळ
(कोषाध्यक्ष)

आकडेवारी

50k+
दर्शन

1000+
देणगीदार

10+
प्रायोजक

100+
कार्यकर्ते

छायाचित्रे

गणेश उत्सवाची छायाचित्रे

View More

सामाजिक उपक्रमांची छायाचित्रे

View More

आमचे सामाजिक उपक्रम